इथॉलॉजिस्ट बनायचंय?

– अपर्णा देवकर

इथॉलॉजी ही झुलॉजीची उपशाखा असून यामध्ये प्राण्यांच्या वागणुकीचा, त्यांच्या जीवनशैलीचा शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास केला जातो. खासकरून नैसर्गिक वातावरणातील प्राण्यांचे वागणे आणि प्रतिकूल वातावरणातील प्राण्यांचे वागणे यांचा अभ्यास केला जातो. मनात प्राण्यांविषयी नैसर्गिक प्रेम असेल, जिव्हाळा असेल, कुठल्याही प्रकारची भीती नसेल तर या जगात सर्व प्रकारच्या प्राण्यांची संख्या संतुलित राखण्यासाठी आणि पृथ्वीवरील ही जीवसृष्टी सुरक्षित राखण्यासाठी एक उदात्त धेय्याने तुम्ही काम करू शकता

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पृथ्वीवर मानवाव्यतिरिक्‍त असंख्य जीव आढळतात. ही जीवसृष्टी जाणून घेणे हा अतिशय कुतुहलाचा आणि अभ्यासाचा भाग आहे. ज्या व्यक्‍तींना वेगवेगळ्या प्राण्यांचे अजिबात भय वाटत नाही आणि निसर्गाच्या प्रत्येक जैव वैविध्याबद्दल नितांत प्रेम आहे अशा व्यक्‍तींनी इथॉलॉजीचे क्षेत्र करिअर म्हणून निवडायला हरकत नाही. इथॉलॉजी या विषाया अंतर्गत प्रण्यांच्या वागणुकीतचा शास्त्रीय दृष्टीकोनातून आणि वस्तूनिष्ट पद्धतीने अभ्यास केला जातो. इथॉलॉजी ही प्राणीशास्त्राची (झुलॉजी) एक उपशाखा आहे. इथॉलॉजी या विषयाचा प्रमुख भाग म्हणजे नैसर्गिक वातावरणातील प्राण्यांचे रहाणीमान, वागणूक आणि प्रतिकूल परिस्थितीत असणारे त्यांचे वागणे याचा अभ्यास होय. इथॉलॉजिस्ट हा प्राण्याच्या मानसशास्त्राचा अभ्यास करतो. त्यासाठी अनेक संदर्भ तपासतो.

करिअरच्या संधी : इथॉलॉजिस्ट म्हणून काम करताना प्राण्यांच्या वागण्याचा आणि एकूणच त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणारे अभ्यासक म्हणून तुम्ही काम करू शकता. या क्षेत्रात कामाला सुरुवात करतातच तुम्ही प्रत्यक्ष फिल्डवर्कवरच काम सुरु करतात. इथॉलॉजिस्ट म्हणून काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागतो. ज्या ठिकाणी विशिष्ट प्राण्यांच्या प्रजाती राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सर्व जीवनचक्राचा अभ्यास करावा लागतो. हे काम करताना प्राण्यांच्या जीवनशैलीची माहिती घ्यावीच लागते पण त्याचसोबत त्यांचा सांभाळ करणे, त्यांना खाऊ घालणे, अभ्यासासाठी त्यांना प्रयोगशाळेतील कृत्रीम वातावरणात घेऊन जाणे व पुन्हा त्यांच्या मुळे स्थानी नेऊन सोडणे या सर्व गोष्टींचा समावेश असतो. तुमच्या मनात प्राण्यांविषयी नैसर्गिक प्रेम असेल, जिव्हाळा असेल, कुठल्याही प्रकारची भीती नसेल तर या जगात सर्व प्रकारच्या प्राण्यांची संख्या संतुलित राखण्यासाठी आणि पृथ्वीवरील ही जीवसृष्टी सुरक्षित राखण्यासाठी एक उदात्त धेय्याने तुम्ही काम करू शकता.

शैक्षणिक गुणवत्ता : इथॉलॉजी हा एक मानद अभ्यासक्रम आहे किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून राबवला जातो. सामान्यपणे झुलॉजी, इथॉलॉजी किंवा इन्व्हायरमेंटल सायन्समध्ये पदवी असणे आवश्‍यक असते. अतिरिक्‍त फायद्यासाठी तुमच्याकडे जर मानसशास्त्रामधील पदवी असेल तर फायदेशीर ठरते. तांत्रिक दृष्ट्या व्हेटर्निटी सायन्समधील पदवीसुद्धा इथॉलॉजिस्ट बनण्यासाठी गरजेची असते. यामुळे प्राण्यांच्या अंतर्गत रचने बाबतदेखील चांगली माहिती होते. अनुवंशिकता अर्थात जेनेटिक्‍स इव्हॉल्युशनरी बायोलॉजी या विषयातील पदवीसुद्धा प्राण्यांचे मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयोगी पडते. भारतात एखादी पदवी घेतल्यानंतर परदेशात जाऊन ऍनिमल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे फायद्याचे ठरते.

इथॉलॉजीचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या प्रमुख संस्था.

  • युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, यु.एस.ए.
  • बुकनेल युनिव्हर्सिटी, यु.एस.ए.
  • लिंकोपिंग युनिव्हर्सिटी, स्विडन.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)