Etawah News: लग्न समारंभ सुरू असतानाच वधूचा दुर्दैवी मृत्यू

त्याच लग्नमंडपात वराने केले वधूच्या बहिणीशी लग्न इटावा

देशात करोना महामारीची तीव्रता कायम असली तरी देशात लग्न समारंभाचे प्रमाण काही कमी झालेले नाही अशा लग्न समारंभात अनेक विचित्र गोष्टी घडताना दिसतात असाच एक प्रकार इटावा शहरात नुकताच घडला आहे लग्नाचे विधी सुरू असतानाच वधु चक्कर येऊन कोसळली आणि तिचा त्याचठिकाणी मृत्यू झाल्यानंतर वराने त्याच मंडपामध्ये वधूच्या बहिणीशी लग्न केले

या लग्न समारंभातील नियोजित वधुवर जेव्हा सर्व विधी पार पाडून सात फेरे यांची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच अचानक वधू खाली चक्कर येऊन खाली कोसळली आणि त्याच ठिकाणी तिचा मृत्यू झाला त्यानंतर वधू आणि वर यांच्या कुटुंबीयांनी एकत्र चर्चा करून मृत वधूच्या बहिणीशी या वराचे लग्न करून देण्याचा निर्णय घेतला या लग्न समारंभातील वराचे नाव मनोज कुमार असून त्याच्या मृत वधूचे नाव सुरभी असे होते या वराने ज्या आपल्या मृत वधूच्या बहिणीशी लग्न केले तिचे नाव निशा असे आहे लग्न समारंभ संपूर्ण पार पाडल्यानंतर सुरभीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशा प्रकारचा निर्णय घेणे आमच्यासाठी जड होते पण व्यावहारिक विचार करून आम्ही हा निर्णय घेतला अशी माहिती सुरभीचे काका अजब सिंग यांनी दिली ज्या ठिकाणी लग्न होणार होते त्या ठिकाणच्या जागेमध्ये एका खोलीत सुरभिचा मृतदेह असतानाच दुसर्‍या खोलीमध्ये आम्ही लग्नसमारंभ करत होतो अशी माहितीही त्यांनी दिली एकीकडे एका मुलीचा मृत्यू झाला असतानाच दुसरीकडे दुसऱ्या मुलीचा लग्नसमारंभ होत असल्याने आमच्या मनात संमिश्र भावना आहेत असेही त्यांनी सांगितले

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.