पुणे – भारताचा पारंपरिक क्रीडा प्रकार असलेल्या मल्लखांबाचा आशिया संघ स्थापन झाला आहे. आशिया खंडात या खेळाचा प्रचार, प्रसार करणे तसेच विविध उपक्रम राबवून या खेळाची लोकप्रियता आणखी वाढवणे हाच हा संघ स्थापन करण्यामागचा उद्देश आहे.
आशिया संघासह या खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी जपान, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, दुबई, श्रीलंका व मालदीव या देशांच्या मल्लखांब संघटनांनी दाखवली आहे.
अन्य देशांतील मल्लखांबपटूंशी तसेच या खेळाची आवड असलेल्यांशी संवाद साधून त्यांनाही या उपक्रमात सामावून घेतले जाणार आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजीव जालनापूरकर व भारतीय मल्लखांब महासंघाचे माजी खजीनदार दिलीप गव्हाणे यांनी अन्य सहकाऱ्यांसमवेत या मल्लखांब संघाची स्थापना केली आहे.