प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना -राजकुमार बडोले

मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे. वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिली.

ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी बडोले बोलत होते.

यावेळी बडोले म्हणाले, राज्याच्या सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाने प्रयत्न करुन याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक त्वरित निर्गमित करावे. आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयांमध्ये वृद्धांसाठी पाच टक्के खाटांची सोय करावी. ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरविकास व ग्रामविकास विभागामार्फत देखभाल व विरंगुळा केंद्र स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

वृद्धांना आश्रय देणाऱ्या  व त्याची देखभाल करणाऱ्या पाल्यांना केंद्र सरकारकडे आयकरात सूट देण्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र सरकाकडे पाठविला जाईल. शासन अनुदानित वृद्धाश्रमातील  वृद्धांना परिपोषण अनुदान 900 रुपयांऐवजी 1500 रुपये करण्यात आले आहे. राज्य शासन दरवर्षी ज्येष्ठ नागरिक दिनादिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या स्थितीबाबत वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती बडोले यांनी यावेळी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.