सातगाव पठारात होणार शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

पेठ-सातगाव पठारावरील सर्व शेतकरी वर्गाच्या उन्नतीस हातभार लागावा, शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा या हेतूने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून शेतमालाची योग्य विक्री व व्यवस्थापन करून शेतकऱ्याला विविध योजनांबद्दल माहिती करून देणेबाबत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे अधिकारी स्वप्नील फुंदे, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांनी मार्गदर्शन केले.

शेतकरी मार्गदर्शन व संवाद बैठक आज पेठमध्ये वाकेश्वर मंदिरात आयोजित केली होती. या बैठकीस सातगाव पठारावरील बहुसंख्येने शेतकरी बंधू आणि पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला संबंधित करताना डॉ. ताराचंद कराळे म्हणाले, या कंपनीच्या मार्फत शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचावु शकतो. तसेच सध्या शेतकरी कंपनी स्थापन करण्याच्या दृष्ट्या सुवर्णकाळ आहे. ही कंपनी स्थापन करण्यासाठी सर्व प्रकारे मदत करणार असल्याचे सांगितले.

या चर्चासत्रला मार्गदर्शक म्हणून स्वप्नील फुंदे, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आनंद पटवरी, समन्वय महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ अमोल कोरडे, संचालक बोरी बुद्रक व्हिलेज फार्मर प्रोडुसींग कंपनी युवराज कोरडे आदी मान्यवर उपलब्ध होते. चर्चासत्रास दिलीप पवळे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, दत्तात्रय मोरडे, विलास घेवडे, रोहिदास चक्कर, उमेश तळेकर, उमेश कंधारे, प्रल्हाद कुदळे, विनायक धुमाळ, मनोहर पवळे, ज्ञानेश्वर रासकर, हेमंत चिखले, गुलाब हिंगे, प्रमोद बाणखेले, सचिन कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here