नवी दिल्ली – सर्व राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नावर पक्षाला सल्ला देण्यासाठी कॉंग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन सल्लगार गट स्थापन केला आहे. त्यात राहुल गांधी यांचाही समावेश असून रणदीपसिंग सुर्जेवाला हे या गटाचे निमंत्रक म्हणून काम पहाणार आहेत.
देशातील महत्वाच्या विषयांवर पक्षाची भूमिका निश्चीत करण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आला असून हा गट रोजच बैठक घेणार आहे असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. पी चिदंबरम, मनिष तिवारी, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल हे ज्येष्ठ नेते गटाचे सदस्य असतील. त्यांच्या खेरीज प्रवीण चक्रवर्ती, गौरव वल्लभ, सुप्रिया श्रीनाटे, रोहन गुप्ता यांनाही या गटाचे सदस्यत्व देण्यात आले आहे.