मुळशी : राज्य अग्निप्रतिबंधक दल स्थापन करा

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या जळीत प्रकरणांत अनेक जणांचा बळी गेला. सोमवारी उरवडे (ता. मुळशी) येथेही कंपनीला आग लागून मोठी जिवितहानी झाली. 

या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा “महाराष्ट्र राज्य अग्निप्रतिबंधक दला’ची आवश्‍यकता भासत आहे. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार शहरी व निमशहरी भागांमध्ये अग्निशामक यंत्रणा अस्तित्वात आहे.

परंतु जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ही यंत्रणा पुरेशा क्षमतेने कार्यरत नाही. परिणामी अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतर जिवितहानी होण्याची शक्‍यता अधिक वाढते.
– सुप्रिया सुळे, खासदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.