पुणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना पॉझिटिव्ही दर 12.6 टक्के असून, ऑक्सिजन बेड उपलब्धता 31.57 टक्के आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामपंचायत, नगरपालिका हद्दीत अनलॉकचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आदेश जारी केले आहेत. हे नियम सोमवारपासून (दि.7) पासून लागू होणार आहे.
नव्या नियमानुसार किराणा दुकान, भाजीपाला, फळे, दूध आदी दुकाने आठवड्यातील सातही दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच व्यायामशाळा, सलून, स्पा, केशकर्तनालय आणि ब्युटी पार्लरची दुकाने सोमवार ते शुक्रवारी चारपर्यंत सुरू राहणार आहे.
तर हॉटेलमधून फक्त पार्सल सेवेला परवानगी राहणार आहे. लग्नसंभारंभासाठी फक्त 25 व्यक्तीनांचा परवानगी असेल. हे आदेश येत्या 15 जूनपर्यंत लागू असणार आहे. पहाटे 5 ते सायंकाळी 5 पर्यंत जमावबंदी, तर सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे.
अत्यावश्यक सेवेत या दुकानांचा समावेश
छत्री विक्री, दुरुस्ती, रेनकोट, प्लॅस्टिक ताडपत्रीची दुकाने
कृषीविषयक सेवा केंद्र.
पावसाळा हंगामासाठी आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे घटक
पशुवैद्यकीय सेवा, दवाखाने, पेट फुड शॉप
हे राहणार सुरू
हॉटेलमधून फक्त पार्सल सेवा
चालणे, सायकलिंगसाठी मैदान सोमवार-शुक्रवार सकाळी 5 ते 9
बॅंकिंग क्षेत्र, वकिलांची कार्यालये
चित्रिकरण फक्त सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 पर्यंत
50 टक्के क्षमतेने बस व्यवस्था