नवी दिल्ली, दि. 26- कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अर्थात ईएसआयसीच्या सामाजिक सुरक्षा योजनेत यंदा जानेवारीत 11.55 लाख नवीन सदस्यांची भर पडली. महिन्याच्या सुरुवातीच्या काळात या योजनेशी संबंधित 12.22 लाख सदस्य संबंधित होते. नवीन आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अर्थात अहवालाचा एक भाग आहे.
आकडेवारीनुसार, जून 2020 मध्ये ईएसआयसीच्या योजनेत 8.87 लाख सदस्य, मेमध्ये 4.89 लाख आणि एप्रिलमध्ये 2.63 लाख सदस्यांची भर पडली. यावरून असे सूचित होते की, करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर योजनेशी संबंधित लोकांची संख्या वाढली. तसेच लोकांना नियमित वेतनावर रोजगार मिळाले.
जुलै 2020 मध्ये ईएसआयसी योजनेत सामील झालेल्या एकूण सभासदांची संख्या 7.63 लाख होती, ती ऑगस्टमध्ये 9.5 लाख, सप्टेंबरमध्ये 11.58 लाख आणि ऑक्टोबर 2020 मध्ये 12.09 लाख झाली. त्याचबरोबर ती डिसेंबरमध्ये 12.22 लाखांवर गेली. एनएसओच्या अहवालानुसार 2019-20 मध्ये ईएसआयसीच्या योजनांमध्ये सामील झालेल्या सदस्यांची संख्या 1.51 कोटी होती जी सन 2018-19 मध्ये 1.49 कोटी होती.