मुंबई – ‘आश्रम 3’च्या ट्रेलरनंतर चाहत्यांची उत्कंठा दुपटीने वाढली आहे. आश्रमच्या तिसऱ्या पार्टमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता ही दिसणार आहे. अभिनेत्री बाबा निरालाबरोबर असणाऱ्या सोनियाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान एका मुलाखतीत अभिनेत्री ईशा गुप्ताने या वेब सीरिज मधील तिने साकारलेल्या सोनियाशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. वेब सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासह अभिनेत्रीने एक मुलाखत दिली. त्यामध्ये तिने वेब सीरिजशी संबंधित अनेक खुलासे केले.
एका वृत्तवाहीच्या मुलाखतीमध्ये ईशा म्हणाली की, ‘पहिल्यांदा मला श्रुती यांचा फोन आला की या वेब सिरीजबाबत प्रकाश झा यांच्या समोर तुझे नाव आहे. त्यावेळी करोनामुळे हो की नाही या विचारात जवळपास 5-6 दिवस निघून गेले. त्यानंतर मी सरांच्या मागे लागले. सरांनी मला पुन्हा सांगितले की कदाचित कास्टिंगसाठी दुसऱ्या व्यक्तीचा विचार केला जात आहे. यानंतर मी सरांना सकाळ, दुपार आणि रात्री, गुड मॉर्निंग ते गुड नाईट असे सुमारे 20 दिवस मेसेज करत राहीले आणि त्यांना सीरिजमध्ये भूमिका मिळण्यासाठी सारखे विचारत राहिले. त्यामुळे शेवटी मला जे हवे होते ते मिळाले. पण याचा सरांना खूप त्रास झाला. असा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे.