टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री एरिका फर्नांडिसने “मोस्ट डिझायरेबल वुमन 2020’च्या यादीत प्रथम स्थान मिळवले आहे. ऑनलाईन पोलमध्ये टाकलेल्या मतांच्या आधारे आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींची लोकप्रियता लक्षात घेऊन ही यादी निश्चित करण्यात आली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर एरिकाची मोठी फॅन फॉलोइंग आहे. ती सोशल मीडियावरही खूप ऍक्टिव्ह असते. तिची फोटो सोशल मीडियावर येताच काही मिनिटांत व्हायरल होतात. मागील वर्षी एरिका या यादीत चौथ्या क्रमांकावर होती, पण यावेळी तिने सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान मिळविले आहे.
View this post on Instagram
एरिका फर्नांडिसने या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत एरिकाने एक पोस्ट करत लिहिले की, याबद्दल मी यापेक्षा जास्त कृतज्ञ होऊ शकत नाही. टाइम्सच्या या यादीमध्ये असणे, ही फार मोठी गोष्ट आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास एरिका सध्या टीव्ही शो “कुछ रंग प्यार के ऐसे भी 3’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. “कसौटी जिंदगी के’मधील प्रेरणाच्या भूमिकेत एरिकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
View this post on Instagram
आता ती पुन्हा सोनाक्षीच्या भूमिकेत दिसणार आहे. एरिकाने तिच्या अभिनयानेच नव्हे तर आपल्या स्टाईलनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram