जळगाव | एकाचवेळी घरातून निघाली मायलेकाची अंत्ययात्रा; परिसर हळहळला

जळगाव – मुलाला घेऊन शाळेत जाताना दुचाकी-ट्रकच्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाचवेळी घरातून मायलेकाची अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कविता कृष्णकांत चौधरी (वय-35, रा. विद्यानगर, एरंडोल, जळगाव) आणि मुलगा लावण्य कृष्णकांत चौधरी (वय-9) या मायलेकाचा अपघातात मृत्यू झाला आहे.

कविता चौधरी या शिक्षिका होत्या, आपला मुलगा लावण्यला घेऊन नेहमीप्रमाणे चंदनबर्डी (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर भरधाव वेगाने जाण्याऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. अंगावरून ट्रचे चाक गेल्याने अपघातात शिक्षिका आणि त्यांच्या नऊ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला.

विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ओळख –

मायलेकाची अंत्ययात्रा एकाचवेळी घरातून निघाल्याने परिसरातील नागरिक भावनाविवश झाले होते. अपघाता मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षिका कविता चौधरी या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित होत्या. त्यांची शाळा चंदनपुरी येथील आदिवासी वस्तीत होती. बहुतांश विद्यार्थी आदीवासी समाजाचे होते. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी त्यांनी स्वखर्चाने अॅक्वा बसविले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.