हरियाणात अपक्ष ठरविणार भाजपच्या सत्तेचे समीकरण

नवी दिल्ली – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. ९० सदस्यांच्या विधानसभेत ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य बाळगणाऱ्या भाजपाला केवळ ४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर कॉंग्रेसला ३१ जागांवर विजय मिळला. त्यामुळे आता अपक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच अपक्ष उमदेवारांचे भाजपला समर्थन असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी केला आहे. यासंबंधी सात अपक्ष आज मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली.

गोपाल कांडा (सिरसा), चौधरी रणजीत चौटाला(रानिया), राकेश दौलताबाद(बादशाहपुर), नयनपाल रावत(पृथला), बलराज कुंडू(महम) या उमेदवारांनी भाजपाला समर्थन देण्यास सकारात्मक आहेत.

सुभाष बराला यांनी म्हंटले कि, जनादेश भाजपला मिळाले असून अपक्ष उमदेवारांचे भाजपला समर्थन आहे. दिवाळीनंतर मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवू. तसेच सात जागांवर झालेल्या पराभवाची आम्ही समीक्षा करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेता दीपेंद्र हुड्डा यांनीही अनेक अपक्ष उमेदवार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. तसेच जे अपक्ष उमेदवार भाजपला समर्थन देण्यास तयार आहेत ते स्वतःच स्वतःसाठी विहीर खोदत आहेत. ते आपल्या मतांचा लिलाव करत आहेत. त्या उमेदवारांना जनता माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.