लंडन : इंग्लिश प्रिमियर लीगमधील सामन्यात आर्सेनलने मॅचेस्टर युनायटेडचा २-० ने धुव्वा उडवत वर्षाची सुरूवात विजयाने केली आहे.
FULL-TIME Arsenal 2-0 Man Utd
Goals from Pepe and Sokratis give Arsenal their first home win since October #ARSMUN | @Arsenal pic.twitter.com/Fea03Iqo4T
— Premier League (@premierleague) January 1, 2020
आर्सेनलकडून मधल्या फळीतील खेळाडू निकोलस पेप याने ८ व्या मिनिटाला गोल करत सामन्याच्या सुरूवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामन्याच्या पहिल्या सत्रात ४३ व्या मिनिटाला पी सोक्राटिस याने गोल करत २-० अशी आघाडी घेऊन दिली. त्यानंतर आर्सेनल संघाने आपला बचाव कायम ठेवत सामन्याच्या शेवटपर्यंत मँचेस्टर संघाला गोल करण्याची संधीच दिली नाही आणि सामना २-० ने खिशात घातला.
मँचेस्टरवरच्या विजयामुळं आर्सेनलने गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे तर मँचेस्टर युनायटेड ३१ गुणांसह पाचव्या स्थानावर कायम आहे. मँचेस्टर युनायटेडचा संघ चौथ्या स्थानावर असलेल्सा चेल्सीच्या (३६) केवळ ५ गुणांनी मागे आहे.