EPFO New Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) प्रोव्हिडेंट अकाउंट (PF) सदर्भातील नियमात मोठा बदल केला आहे. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांसाठी पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. नवीन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना जुन्या अथवा नवीन कंपन्यांकडे जाऊन ऑनलाइन ट्रान्सफर क्लेम करण्याची गरज पडणार नाही.
ईपीएफओद्वारे नवीन नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. या नियमांमध्ये कोणत्या स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना स्वतः पीएफ खाते ट्रान्सफर करता येईल, याची माहिती देण्यात आली आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा 1 ऑक्टोबर 2017 नंतर जारी केलेला असेल व आधारशी लिंक असल्यास पीएफ खाते ट्रान्सफर करणे सहज शक्य होईल.
वेगवेगळे UAN असणारी खाती असली तरीही ट्रान्सफर शक्य आहे. मात्र, यासाठी सर्व UAN एकाच आधार क्रमांकाशी लिंक असावेत व व्यक्तीची माहिती सर्वत्र समान असावी.
यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा 1 ऑक्टोबर 2017 च्या आधी जारी करण्यात आला असला तरीही हा नियम लागू असेल. मात्र, यासाठीही UAN आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच, व्यक्तीची माहिती जसे की नाव, लिंग, जन्मतारीख सर्वत्र समान असणे आवश्यक. EPFO च्या या नियमामुळे आता कर्मचाऱ्यांसाठी पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद व सोपी होईल.
आधार-पीएफ खाते लिंक कसे करावे?
- यासाठी तुम्हाला EPFO च्या e-sewa पोर्टलवर जावे लागेल.
- वेबसाइटवर गेल्यानंतर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.
- त्यानंतर Manage पर्याय जाऊन ‘केवायसी’ पर्याय निवडा.
- पुढे आधार नंबर व तुमचे नाव टाका.
- त्यानंतर माहिती तपासून सेव्ह करा.
- त्यानंतर तुमच्या आधारवरील माहिती UIDAI रेकॉर्डसह क्रॉस-चेक केली जाईल.
- पडताळणीनंतर आधार-EPF खात्याशी यशस्वीपणे लिंक होईल.