EPFO Decision Of PF Interest Rate । कर्माचरी निर्वाह निधीकडून कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज देण्यात आली आहे. कर्मचारी निर्वाह निधीकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत ईपीएफओने पीएफवरील व्याजदरात आता वाढ केली आहे. पीएफवरील व्याजदर हे ८.२५ टक्केच ठेवण्यात आले आहे. याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
आज कर्मचारी निर्वाह निधीची बैठक पार पडली. या बैठकीत पीएफबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पीएफवरील व्याजदर वाढवण्यात आले आहे. याआधी व्याजदर ८.१५ टक्के होते. त्यानंतर आता व्याजदर ८.२५ टक्के झाले आहे.
सर्वसामान्यांना थोडासा दिलासा EPFO Decision Of PF Interest Rate ।
ईपीएफओने पीएफवरील व्याजदरात थोडी वाढ केली आहे. व्याजदर ८.१५ वरुन ८.२५ टक्के करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून व्याजदरात वाढ केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडासा दिलासा दिलासा आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने ईपीएफओने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार व्याजदर ८.२५ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पीटीआयने रिपोर्ट दिला आहे. या निर्णयाला आता अर्थ मंत्रालयाकडून परवानगी मिळणार आहे. ईपीएफओचे जवळपास ७ कोटी सदस्य आहेत. ईपीएफओ पीएफवरील व्याजदर ठरवते.
पीएफवर सर्वाधिक व्याजदर २०१३-१४ मध्ये होते EPFO Decision Of PF Interest Rate ।
पीएफवर सर्वाधिक व्याजदर हे २०१३-१४ मध्ये होते. यावेळी व्याजदर ८.७५ ठरवण्यात आले होते. यानंतर २०१२-१३ मध्ये ८.५ टक्के होते. २०११-१२ मध्ये व्याजदर ८.२५ टक्के होते. प्रत्येक कर्मचारी पीएफ खात्यात दर महिन्याला पगाराची काही ठरावीक रक्कम जमा करत असतात. या पगारातून काही रक्कम पीएफ खात्यात तर काही रक्कम पेन्शनसाठी जाते. पीएफ ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. ही अशी सरकारी योजना आहे ज्यात सर्वाधिक व्याज मिळते. हे व्याज कर्मचाऱ्यांच्या पीएफ अकाउंटमध्येच जमा केले जाते. तसेच तुम्ही पीएफमधील पैसे काढूदेखील शकतात. तुम्ही आप्तकालीन परिस्थिती, वैद्यकीय उपचारासाठी पैसे काढू शकतात.