#ICCWorldCup2019 : इंग्लंडपुढे खेळाडूंच्या तंदुरूस्तीची समस्या

साउदम्पटन – वेस्ट इंडिजवरील विजयाचा आनंद इंग्लंडला घेता आलेला नाही. त्यांच्यापुढे खेळांडूंच्या तंदुरूस्तीची समस्या निर्माण झाली आहे. कर्णधार इऑन मॉर्गन व जेसन रॉय पुढच्या लढतीत सहभागी होण्याची शक्‍यता कमी झाली आहे.

वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात 41 वे षटक सुरू असताना मॉर्गन याला पाठदुखीमुळे मैदान सोडावे लागले होते. रॉय याला स्नायूच्या वेदनांनी ग्रासले आहे. इंग्लंडचा पुढचा सामना अफगाणिस्तानबरोबर होणार आहे. या दोन्ही खेळांडूंच्या अनुपस्थितीत त्यांना विजय मिळविण्यास अडचण येणार नाही.

मॉर्गन म्हणाला की, माझे दुखणे फारसे काळजी करण्याजोगे नाही. या दुखण्यातून पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल. आगामी सामन्यापूर्वी माझ्या तंदुरूस्तीबाबत स्पष्ट होईल. रॉय याला आणखी दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. आम्ही दोघेही खेळू शकलो नाही तरी अफगाणिस्तानवर मात करण्यास आम्हाला अडचण येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.