राजगुरूनगरमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन

राजगुरूनगर – शहरातील मोठ्या गणेश मंडळांचे व घरगुती गणपतीचे पर्यावरण पूरक विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.

घरगुती गणपतीचे विसर्जनाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. तर शहरातील मोठ्या गणेश मंडळांची सायंकाळी सव्वासहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन घाटात राजगुरुनगर नगर परिषद, राजगुरुनगर रोटरी क्‍लब, राजगुरूनगर लायन्स क्‍लब, ढुम्या डोंगर गिरी भ्रमण ग्रुप, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशन, पर्याय प्रतिष्ठान, खेड पोलीस स्टेशन, चैतन्य महिला विकास संस्था, महिला दक्षता समिती, आर्यन साई ग्रुप, राजगुरुनगर बार असोसिएशन आदी संस्था संघटना शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले.

गणपती विसर्जन घाटाचा शुभारंभ नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष नरेश हेडा, लायन्स क्‍लबचे अध्यक्ष मिलिंद आहेर, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील वाळुंज, चैतन्य महिला संस्थेच्या अध्यक्षा डॉ सुधा कोठारी, रेखा क्षोत्रीय, गणेश घुमटकर, अविनाश कोहिणकर, सतीश नाईकरे, माऊली करंडे, अविनाश कहाणे, प्रशांत घुमटकर, नगरसेवक मनोहर सांडभोर, अर्चना घुमटकर, संपदा सांडभोर, नंदा जाधव, सुधीर येवले, कैलास दुधाळे, अमर टाटीया, चेतन घुमटकर, मनीषा टाकळकर उपस्थित होते. शहरातील मानाचा पहिला गणपती मोती चौक गणेश मंडळाच्या गणपतीच्या नंतर सलग रांगेत माणिक चौक मंडळ, आझादचौक, गणेश चौक,, नवयुग, अहिल्यादेवी, सावतामाळी, वडगादी चौक, सिद्दीविनायक, सरदार चौक, हुतात्मा राजगुरु, सरदार चौक, जुना मोटार स्टॅंड, योगेश्‍वर, एकविरा गणेश मोटर मंडळ यासह अनेक शहरातील मोठी मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत रांगेत होते. तब्बल सहा तास विसर्जन मिरवणूक निघाली.

नागरिकांकडून मूर्तीदान
गेली काही वर्षाच्या नगरपरिषदेच्या मूर्तीदान उपक्रमाला नागरिकांसह गणपती मंडळांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील जवळपास 100 टक्के नागरिकांनी मूर्तीदान केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)