2017 चा अहवाल केंद्र सरकारने केला जाहीर : देशभरात 439 गुन्हे दाखल
तामिळनाडूत देशात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद
पुणे – पर्यवरण रक्षणासाठी विविध कायदे करूनही, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. 2015 ते 2017 या सालात पर्यावरण संदर्भातील गुन्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, 2017 मध्ये राज्यातील पर्यावरणसंदर्भातील गुन्ह्यांची संख्या तब्बल 439 इतकी नोंदविण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, 2018-2019 या सालात हे प्रमाण आणखी वाढले असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
पर्यावरण कायद्याच्या कठोर अंमलबजावणी आणि सक्षम पुराव्याच्या कमतरतेअभावी पर्यावरण गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या “क्राइम इन इंडिया’ या राष्ट्रीय गुन्हेसंदर्भातील नोंदी अहवालात पर्यावरणविषयक गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल एक वर्ष उशिरा प्रकाशित झाल्याने या अहवालातील माहिती आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये तफावत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहवालानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन कायदा आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा या नवीन कायद्यांच्या अंतर्भावामुळे गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली असून, राज्यात या काद्याअंतर्गत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या सुमारे 154 इतकी आहे. यापाठोपाठ पर्यावरण कायद्यांतर्गत 127 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याबरोबरच प्राणी तस्करी, प्रदूषण नियंत्रण कायदा, वृक्षसंवर्धन कायद्यांअंतर्गतदेखील विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
विविध कायद्यांतर्गत नोंदवलेले गुन्हे
वनकायदा आणि वनसंरक्षण कायदा, 1927 – 06
वन्यजीव संरक्षण कायदा,1972 – 52
पर्यावरण कायदा,1986 – 127
हवा आणि पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा,1974 – 1
सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन कायदा, 2003 – 154
ध्वनीप्रदूषण कायदा – 87
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा-2010 – 12
चौकशी सुरू असलेले गुन्हे
मागील वर्षीच296
चालू वर्षाचे439
एकूण735
वर्ष गुन्हे
2015 127
2016 170
2017 439
पर्यावरण आणि प्राण्यांविषयक गुन्हे हे नवीन नाहीत. पूर्वीपासून हे गुन्हे घडत आहे. मात्र पूर्वी या घटनांची नोंद होत नसत. आता कायदयाची अंलबजवणीचे प्रमाण वाढले आहे. तसेच पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत असल्याने हे गुन्हे समोर येत आहेत. त्यामुळेच त्यांची नोंद वाढत आहे.
– ए. श्रीलक्ष्मी, उपवनसंरक्षक, पुणे