बीजिंग : जगाला भेडसावणाऱ्या तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग करोनाशी लढत आहे. तरी अजूनही धोका टळलेला नाही. अशातच आणखी एका नव्या व्हायरसने जगाची धाकधूक वाढवली आहे.
करोना महामारीचे केंद्र ठरलेल्या चीनमध्ये तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये झुनोटिक लानग्या व्हायरस आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेकांना या नवीन विषाणूची लागण झाली आहे. अहवालानुसार, आतापर्यंत 35 जण या व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. या नव्या व्हायरसला लानग्या हेनिपाव्हायरस असेही म्हणतात.