उद्योजकांनी भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत- अर्थराज्यमंत्री

उद्योजकांनी संधीचा फायदा घेऊन गुंतवणूक वाढवावी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 21 लाख कोटी रुपयांच्या सवलती दिल्या आहेत त्याचबरोबर जमीन कामगार आणि कायद्यात सुधारणा करण्यात येत आहेत या सुवर्णसंधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा आणि भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत असे अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

भारत गुंतवणूकीसाठी सुयोग्य केंद्र आहे हे स्थानिक उद्योजकांना गुंतवणूक वाढविल्यास सिद्ध होईल आणि त्यामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होईल आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत केवळ गुंतवणूक सुलभता निर्माण झालेले नाही तर सहा नवे विमानतळ खाजगी क्षेत्रांना उपलब्ध करण्यात आली आहेत संरक्षण साहित्य उत्पादनात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा वाढविण्यात आली आहे.

खान क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले आहे एकूणच सर्व उद्योग खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले आहेत त्याचा देशातील खासगी उद्योजकांनी लाभ घ्यावा स्थानिक गुंतवणुकीची भारताला जास्त गरज आहे स्थानी गुंतवणूक वाढविल्यास परकीय गुंतवणूक आपोआप येत असते असे त्यांनी सांगितले भारतातील कृषी क्षेत्रामध्ये देशांतर्गत मागणी बरोबरच मोठ्या निर्यातीची क्षमता आहे उद्योजकांनी शेतीकडे आणि कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योगाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे भारताची अर्थव्यवस्था पाच वर्षात दुप्पट करण्याचे आपले उद्दिष्ट कायम आहे.

मात्र त्यासाठी फक्त देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून राहून चालणार नाही त्यासाठी निर्यातीचा आजार मोठ्या प्रमाणात घेण्याची गरज आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुधारणा या अंतिम नाहीत सुधारणा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे त्यामुळे आगामी काळात आवश्‍यक तेथे सरकार हस्तक्षेप करील आणि उद्योजकांच्या अडचणी सोडवेल जीवनावश्‍यक वस्तू कायदा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये केलेल्या सुधारणांमुळे भारतीय कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.

अधिक खर्च करण्यासाठी सरकार नोटा छापण्याचा शक्‍यतेवर विचार करणार आहे का असे विचारले असता ठाकूर म्हणाले की याबाबतचा निर्णय घेण्याची गरज नाही सध्या केंद्र सरकारने भरल लाख कोटी रुपयांचे कर्ज घ्यायचे ठरविले आहे करुणा व्हायरस आगामी काळात कोणते रूप धारण करतो त्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत परिस्थिती कशी बदलेल त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील असे ठाकूर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.