वाघोली : करोनावर मात करणाऱ्या महिला डॉक्टरचे मांजरी येथे उत्साहात स्वागत

वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीचे ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे यांच्या भगिनी डॉक्टर स्वाती आंबेकर यांनी आपले मांजरी येथील क्लिनिक कोरोना रोगाच्या काळात चालु ठेऊन “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” म्हणून कार्यरत राहिल्या होत्या. मात्र याच काळात डॉ. स्वाती आंबेकर त्यांच्या वैद्यकीय तपासणी मध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या होत्या.

वाघोली : करोनावर मात करणाऱ्या महिला डॉक्टर स्वाती आंबेकर यांचे मांजरी येथे उत्साहात स्वागत.मांजरी येथील क्लिनिक कोरोना…

Posted by Digital Prabhat on Saturday, 16 May 2020

कोरोना विरुद्धचा यशस्वी लढा जिंकून आल्याची भावना मनाशी बाळगून आंबेकर कोरोना मुक्त होऊन वाघोली येथे परतल्यावर नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. स्वागत पाहून आंबेकर भावूक झाल्या होत्या. सोशल मीडियावर आंबेकर भावनिक पोस्ट खूप चर्चेला आली होती. वाघोली व मांजरी खुर्द येथील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व नागरिकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.