फुरसुंगी – पुणे महापालिकेमध्ये नव्याने 23 गावांचा समावेश करण्याचा अध्यादेश शासनाने जारी केल्यानंतर या गावांपैकी काही गावांतीत ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातून ग्रामपंचायत निवडणूक होणार की नाही? असा संभ्रम या गावांमध्ये झाला होता. अखेर, या गावांत ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण करण्यात आली असून आज अशा गावांत शांततेत मतदान करण्यात आले.
पुणे महापालिका हद्दीलगतची म्हाळुंगे, सूस, बावधन बु., किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नऱ्हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औतांडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली ही गावे पालिकेत समावेशाची प्रक्रिया सुरू केलेली असतानाच या गावांत ग्रामपंचायत निवडणूक जाहीर करण्यात आली.
पालिकेत समावेश करण्यात येणाऱ्या पूर्व हवेलीतील औताडे हांडेवाडी, शेवाळेवाडी, वडाची वाडी या गावांत ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली होती. यासर्वच गावात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली तर आज ग्रामपंचायतीसाठी मतदानही झाले.