Entertainment । ‘स्त्री’च्या निर्मात्यांच्या ‘मुंज्या’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. अशात आता या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ‘ककुडा’ घेऊन येत आहे. OTT वर प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचा एक मजेशीर ट्रेलर रिलीज झाला आहे, जो पाहून तुम्हाला हसू येण्यासोबतच भीती वाटेल. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम स्टारर ‘ककुडा’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते उत्सुक आहेत आणि भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
‘ककुडा’च्या ट्रेलरमध्ये रातोरी हे शापित गाव दाखवण्यात आले आहे, जिथे प्रत्येक घराला दोन दरवाजे आहेत. एक मोठा आणि दुसरा लहान. छोटा दरवाजा ककुडाचा आहे, जो दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता येतो आणि जो कोणी त्याच्यासाठी दार उघडे ठेवत नाही, त्याच जीवन 13 व्या दिवशी संपते.
एका यूजरने लिहिले की, ‘सुपरहिट है भाई.’ दुसरा म्हणाला की हा चित्रपट रिलीज होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. काही लोक म्हणतात की, ट्रेलर खूप मजेदार आहे तुम्ही हा चित्रपट घरी बसून पाहू शकता. हे OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज होईल. निर्मात्यांनी रिलीजची तारीख आधीच जाहीर केली होती. 12 जुलै रोजी 9 दिवसांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रातोडीचे रहस्य उघड होईल आणि ककुडाचा शाप काय..! आता दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता दार उघडे ठेवा कारण ककुडा येणार आहे.