अक्षय-सोनम ‘या’ सिनेमात पुन्हा एकदा दिसणार एकत्र

बाॅलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि अक्षय कुमार यांची जोडी पुन्हा एकदा सिनेमात एकत्र दिसू शकते. बाॅलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने ‘सिम्बा’च्या यशानंतर लगेच ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

सूर्यवंशी या सिनेमात अक्षयकुमारला कास्ट करण्यात आले आहे. सिनेमात अक्षयच्या सोबत अभिनेत्री म्हणून सोनम कपूरला घेणार असण्याची चर्चा आहे. माहितीनुसार रोहित शेट्टी आणि त्याच्या टीमने सोनम हिच्यांशी या प्रोजेक्ट बदल बातचीत केली आहे. यापूर्वी अक्षय़ आणि सोनम पॅडमॅन या सिनेमात एकत्रित दिसले होते.

दरम्यान अक्षयची अभिनेत्री पूजा हेगडे हिला कास्ट केले जाऊ शकते अशी सुध्दा चर्चा ऐकायला मिळत आहे. काही माध्यमाकडून कैटरीनाचे नावसुध्दा समोर आले होते पण आता असे समजते की सोनमलाच सिनेमासाठी कास्ट केले जाऊ शकते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)