महाराष्ट्रात पुन्हा संचारबंदी सुरु आहे पुन्हा एकदा कोरोना मुळे मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. सगळीकडे फक्त संचारबंदीच्याच बातम्या सुरु आहेत, ह्या सर्व नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झी मराठी तुमच्या सोबत असणार आहे. कारण आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग सुरूच राहणार आहेत. अविरत मनोरंजन करण्याचा वसा घेत झी मराठी तुमचं मनोरंजन करतच राहणार आहे. कारण मनोरंजन थांबलं नाही, थांबणार नाही
ह्याची सुरुवात होतेय १८ एप्रिल ला होणाऱ्या “घेतला वसा टाकू नको” आणि “माझा होशील ना” या मालिकांच्या १ तासांच्या विशेष भागापासून. पौराणिक कथा आणि चातुर्मासातले व्रतवैकल्य यावर आधारित ‘घेतला वसा टाकू नको’ ह्या मालिकेचा “कहाणी गुढीपाडव्याची” चा एका तासाचा भाग दुपारी १२ वा. आणि संध्या. ७ वा. दाखवण्यात येणार आहे. तसेच सोमवार पासून याच मालिकेतून ‘रामनवमी’ विशेष भाग प्रक्षेपित होतील या विशेष भागांमध्ये भगवान श्रीराम यांच्या जन्माआधी पासून ते श्रीराम जन्मापर्यंतची रंजक कहाणी दाखवण्यात येणार आहे.
माझा होशील ना हि मालिका आता एका वेगळ्या वळणार येणार आहे, मनालीवरून परत आल्यावर ब्रह्मे घरावर आणि सई आदित्य समोर अनेक नवीन आव्हाने असणार आहेत, गुलप्रीत हीच बंधू मामाची बायको आहे हे घरातल्या सगळ्यांना कळणार आहे, तसेच दादामामाची बायको सिंधू ने घराचा ताबा घेतला आहे, तिकडे जे डी चा आदित्य ग्रुप ऑफ कंपनी वर डोळा आहे. ह्या सर्व आव्हानांना हे कुटुंब कसं सामोरं जाईल? ह्यासाठी “माझा होशील ना” चा १८ एप्रिल चा दुपारी १ आणि रात्री ८ वा. चा भाग पाहायला विसरू नका. आणि सोमवार १९ एप्रिल पासून आपल्या आवडत्या मालिकांचे नवेकोरे भाग पाहायला विसरू नका.
मनू आणि अनिकेत च्या लग्नाचं सत्य विक्षिप्त समर आणि मनूच्या घरच्यांसमोर येईल, पाहत राहा ‘पाहिले ना मी तुला’‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मध्ये तुम्ही पाहू शकाल मोमो सोबत ओम चा साखरपुडा संप्पन होईल की शकू मावशी रॉकी च्या मदतीने स्वीटू आणि ओम ला एकत्र आणेल?
‘अग्गबाई सुनबाई’ मध्ये सोहम चं खरं रूप आसावरी समोर येईल का?
कसं सामोरं जाईल ब्रह्मे कुटुंब आणि सई आदित्य समोर आलेल्या संकट आणि आव्हानांना? ‘माझा होशील ना’
दिव्या डॉ. अजित चं खरं रूप जगासमोर आणेल? यासाठी पाहात राहा देवमाणूस
अभिराम वाडा विकायला तयार होईल? सरिता वाडा विकण्याचा विचार करत असताना दत्ता का जाईल विरोधात? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी रात्रीस खेळ चाले ३ चे भाग चुकवू नका.