करोनाबाधित असतानाही बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री करत होती शूटिंग; बीएमसीने केली ‘मोठी’ कारवाई

मुंबई – राज्यातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये विषाणू संसर्गाचा वेग नियंत्रणाबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून यामुळेच लॉक डाऊनचे पाऊल उचलावे लागले आहे. देशात करोना विषाणूने प्रवेश केल्यापासूनच मुंबई शहर त्याचा प्रमुख हॉटस्पॉट ठरले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील रुग्णसंख्या कमालीची घटल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र शहरातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन पुन्हा ‘अलर्ट’ झाले आहे.

अशातच आज, मुंबई महापालिकेने करोना संबंधित सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खान हिच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. याबाबतची माहिती बीएमसीच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून देण्यात आली असून यासोबतच, ‘शहराच्या सुरक्षिततेशी तडजोड नाही’ असा संदेशही देण्यात आलाय. बीएमसीच्या ट्विटमध्ये केवळ बॉलिवूड अभिनेत्री असा उल्लेख करण्यात आला  असला तरी एएनआय या वृत्तसंस्थेद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री गौहर खानचं असल्याचं समजतंय.

बीएमसीने ट्विट केलेल्या एफआयआरच्या फोटोसह, नागरिकांना करोना संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आलंय. यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना, ‘करोना संबंधित सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करा अन्यथा कडक लॉक डाऊन करावा लागेल’ असा गंभीर इशारा दिला होता.

दरम्यान, अभिनेत्री गौहर खान हिची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून ती चित्रीकरण करत असल्याची माहिती बीएमसीला मिळाली होती. यानंतर बीएमसीचे अधिकारी तिच्या मुंबई येथील निवासस्थानी पोहचले. मात्र ती तेथे न आढळल्याने अखेर तिच्याविरोधात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.