मुंबई – डिसेंबर महिन्यात पब्लिकला ख्रिसमसच्या सुट्टा असतात. बरेचजण सुटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतात. हे लक्षात ठेवून बरेच मोठे सिनेमे याच महिन्यत रिलीज केल्या
जात असतात. ओटीटीवर देखील याच काळात अनेक पॉप्युलर शोचे स्ट्रिमिंग सुरू होणार आहे. यामध्ये 3-4 मोठ्या फिल्म आणि वेबसिरीजचाही समावेश आहे.
यातील पहिला सिनेमा अभिषेक बच्चनचा “बॉब बिस्वास’ आहे. विद्या बालनच्या “कहानी’मध्ये बॉब बिस्वास नावाची व्यक्तिरेखा होती. त्या पात्रावरच हा सिनेमा आधारलेला आहे.
यामध्ये चित्रांगदा सिंहदेखील असणार आहे. ही फिल्म झी 5 वर दिसणार आहे. क्रिकेटवर आधारित “इनसाईड एज’ या वेबसिरीजचा तिसरा सीझन देखील 3 डिसेंबरपासून सुरू होतो आहे.
पहिल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तिसऱ्या सीझनचीही प्रतीक्षा होती. ही सिरीज ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सवर
स्ट्रिमिंग होणारी “मनी हिस्ट’ ही सिरीज भारतातही खूप लोकप्रिय झाली होती. या वेबसिरीजचा पाचवा सीझन 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. याशिवाय सुरवीन चावला आणि माधवन यांचे लीड रोल असलेला “डिकपल्ड’ हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर दिसणार आहे.