महापालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी – करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. मात्र तरीही नागरिक काळजी घेताना दिसत नाही. मंगळवारी (दि. 1) सकाळी पिंपरी भाजी मंडई येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. येथील गर्दीकडे पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने करोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉक डाऊन केले आहे. फक्त किराणा माल, भाजीची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या आहेत. मात्र ही खरेदी करतानाही तीन फूटांचे सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मात्र नागरिक सरकारने केलेल्या आवाहनाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला कठोन निर्णय घेण्यास भाग पाडू नका, असा इशारा सरकाने देऊनही नागरिकांच्या वर्तणूकीत फारसा फरक पडलेला नाही.
रविवार व सोमवारी पिंपरीतील भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिका व पोलीस प्रशासनाने बंद केली होती. मंगळवारी अंशतः मंडईतील दुकाने सुरू असल्याने फारशी गर्दी नव्हती. मात्र बुधवारी सकाळी या मंडईत नागरिकांनी मोठ्या गर्दी केली. यामुळे करोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त होत आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन या दोघांनी येथील मंडईतील गर्दीकडे दुर्लक्ष केले आहे.