थेरगावामध्ये जिवंत देखाव्यातून समाज प्रबोधन

पिंपरी – देखाव्यातून समाज प्रबोधन करण्याची परंपरा थेरगावमधील मंडळाने यंदाही जपली आहे. हे देखावे पाहण्यासाठी शहराच्या विविध भागातून भाविक येत आहेत.

अवयव दान – सर्वश्रेष्ठ दान
क्रांतीनगर, थेरगाव येथील क्रांतिवीर मित्र मंडळाने “अवयव दान, सर्वश्रेष्ठ दान’ हा जिवंत देखावा सादर केला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर बारणे यांनी दिली. या मंडळाचे संस्थापक संभाजी बारणे आहेत. तसेच डांगे चौक येथील मयूरेश्‍वर मित्र मंडळानेही “अवयव दान’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. या मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील आहेत.

हरवलेली माणुसकी
थेरगावातील आनंदा पार्क मित्र मंडळाने यंदा “हरवलेली माणुसकी’ हा जिवंत देखावा सादर केल्याची माहिती अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी दिली. या देखाव्याची संकल्पना तुषार बडंबे आणि प्रतीक गोपाळ यांची आहे.

देव देव्हाऱ्यात नाही
लक्ष्मणनगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या वर्षी “देव देव्हाऱ्यात नाही’ हा जिवंत देखावा सादर करीत भाविकांची मने जिंकली आहेत. या मंडळाचे संस्थापक तुकाराम गुजर असून विद्यमान अध्यक्ष अक्षय गुजर हे आहेत. तसेच सोळा नंबर, थेरगाव येथील सन्मित्र मित्र मंडळाने यंदा आकर्षक फुलांची सजावट केली आहे. या मंडळाचे संस्थापक नंदकुमार बारणे असून सध्या गणेश बारणे हे अध्यक्षस्थानी आहेत.

तो सध्या काय करतो?
संतोषनगर, थेरगाव येथील श्रीमंत शिवाजी मित्र मंडळाने सर्वांनाच विचार करायला लावणारा “तो सध्या काय करतोय?’ हा जिवंत देखावा सादर केला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन बारणे यांनी दिली. या मंडळाचे मार्गदर्शक संतोष बारणे हे आहेत. तसेच चैतन्य तरुण मित्र मंडळाने यंदा आकर्षक फुलांचा महाल उभारला आहे. या मंडळाचे अध्यक्ष गणेश कदम हे आहेत.
मी तुमची वाट पाहत आहे

दत्तनगर, थेरगाव येथील सम्राट मित्र मंडळाने यंदा “मी तुमची वाट पाहत आहे, हा जिवंत देखावा सादर केला असल्याची माहिहती मंडळाचे अध्यक्ष निलेश बारणे यांनी दिली. या देखाव्याची संकल्पना निखिल देशपांडे यांची आहे. याच परिसरातील विशाल मित्र मंडळाने “गजमहल’ हा देखावा सादर केला आहे. या मंडळाचे अध्यक्ष योगेश बारणे हे असून मार्गदर्शक माजी नगरसेवक सिद्धेश्‍वर बारणे आहेत.

मनोरंजन नगरी
वनदेवनगर, थेरगाव येथील वनदेव मित्र मंडळाची यंदा “लालबागच्या राजा’ ची 15 फुटी सुबक मूर्ती आणली असून “राजमहल’ हा देखावा सादर केला असल्याची माहिती अध्यक्ष सुरेंद्र बारणे यांनी दिली. या मंडळाचे संस्थापक अभिषेक बारणे आहेत. तसेच बच्चे कंपनीसाठी मनोरंजन नगरी उभारण्यात आली आहे. तसेच रुद्रप्रभू शासन प्रतिष्ठान या मंडळानेही आकर्षक सजावट केली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×