बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आजकाल आपल्या कुटुंबीयांसह अमेरिकेत राहत आहे. दरम्यान, ती स्वत:साठी थोडा वेळ काढत मोकळी हवा आणि उगवत्या सूर्याचा आनंद लुटताना दिसली. सनीने इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केले आहे, ज्यात ती निळ्या रंगाच्या समर कूल ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहताना असे दिसते की कदाचित तिने हा फोटो तिच्या घराच्या छतावरून घेतलेला असेल.
फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिली आहे की, “कॅलिफोर्नियातील सूर्यप्रकाश आणि ताज्या हवेला काही तोडच नाही.’ सनीने तिचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. या दिवसात ती स्वत:साठी भाजीपाला पिकवत आहे आणि ऍनिमल लर्निंग सेंटरलाही भेट देत आहे, जिथे ती जिराफला खायला घालताना दिसत आहे.
दरम्यान, सनी आपल्या कुटुंबासमवेत मे महिन्यात अमेरिकेला गेली होती. कारण तिला असा विश्वास होता की साथीच्या आजारात भारतापेक्षा ती अमेरिकेत अधिक सुरक्षित असेल. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, सनी लवकरच “वीरामादेवी’ आणि “कोका कोला’मध्ये झळकणार आहे.