#ENGvWI 3rd Test : विंडीजचा पराभव पावसामुळे लांबला

मॅंचेस्टर-इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक क्रिकेट कसोटी सामन्यात पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या वेस्ट इंडिजला संततधार पावसाने दिलासा मिळाला आहे. अर्थात, त्यांचा पराभव पावसाने फक्‍त लांबला आहे पण टळलेला नाही.

पहिल्या डावात त्रिशतकी पल्ला गाठल्यावर इंग्लंडने वेस्ट इंडिजला दोनशे धावांच्या आत रोखत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर आपला दुसरा डाव 2 बाद 226 या धावसंख्येवर घोषित वेस्ट इंडिजसमोर या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी 389 धावा करण्याचे आव्हान ठेवले. वेस्ट इंडिजने आपला दुसरा डाव रविवारी सुरू केल्यावर त्यांचे दोन गडी झटपट बाद करत इंग्लंडने सामना जिंकण्याच्या मार्गावर वाटचाल सुरू केली होती.

मात्र, सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळपासून संततधार पावसाला प्रारंभ झाला व उपाहारापर्यंतचा खेळ वाया गेला. रविवारी दिवसअखेर वेस्ट इंडिजची 2 बाद 10 अशी बिकट अवस्था झाली होती. पहिल्या डावात 6 गडी बाद करणाऱ्या इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडनेच वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना बाद करत पुन्हा एकदा वर्चस्व राखले. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेला करोनाच्या सावटाखाली सुरुवात झाली.

पहिली कसोटी जिंकत वेस्ट इंडिजने मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र, दुसरी कसोटी जिंकून यजमान इंग्लंडने बरोबरी साधली त्यामुळे मालिका विजयासाठी दोन्ही संघांसाठी ही कसोटी निर्णायक ठरली आहे.

संक्षिप्त धावफलक – इंग्लंड पहिला डाव – 369. वेस्ट इंडिज पहिला डाव – 197. इंग्लंड दुसरा डाव – 2 बाद 226 घोषित. वेस्ट इंडिज दुसरा डाव – 6 षटकांत 2 बाद 10.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.