#ENGvWI 2nd Test : तिसऱ्या दिवशी पावसाचाच खेळ

मॅंचेस्टर – इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवशी संततधार पावसाचाच खेळ रंगला. पहिले व दुसरे सत्र पावसाने वाया गेले. 

इंग्लंडने आपला पहिला डाव 9 बाद 469 धावांवर घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिजची दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 32 अशी स्थिती झाली होती. ते अद्याप 437 धावांनी पिछाडीवर आहेत. शुक्रवार रात्रीपासूनच संततधार पाऊस पडत असल्याने तिसऱ्या दिवशी सकाळी खेळच सुरू होऊ शकला नाही. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी, पहिल्या कसोटीतील पराभव जिव्हारी लागलेल्या इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत मात्र जबाबदारीने खेळ केला. शुक्रवारी दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने आपला पहिला डाव 469 धावांवर घोषित केल्यावर दिवसअखेर वेस्ट इंडिजची 1 बाद 32 अशी स्थिती केली होती. इंग्लंडच्या डॉमनिक सिबली आणि बेन स्टोक्‍स यांनी संघाची सूत्रे हाती घेत संघाला चारशे धावांपेक्षा जास्त ल्ला गाठून दिला.

स्टोक्‍सने 176 तर सिबलीने 120 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून फिरकीपटू रॉस्टन चेसने पाच गडी बाद केले. इंग्लंडचा नियमित कर्णधार ज्यो रूट संघात परतल्याने त्यांची फलंदाजी सशक्‍त बनली. मात्र, प्रत्यक्षात रूटला मोठी खेळी करण्यात अपयश आले. रॉस्टन चेसने इंग्लंडला धक्‍का दिला. रूटही केवळ 23 धावा काढून तंबूत परतला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : पहिला डाव – 162 षटकांत 9 बाद 469 घोषित. (बेन स्टोक्‍स 176, डॉमनिक सिबली 120, जोस बटलर 40, डॉमनिक बेस 31, ज्यो रूट 23, रॉस्टन चेस 5/172, केमार रोश 2/58). वेस्ट इंडिज पहिला डाव – 14 षटकात 1 बाद 32. (जॉन कॅम्पबेल 12, अल्झारी जोसेफ खेळत आहे. 14, क्रेग बर्थव्हाइट खेळत आहे 6, सॅम कुरेन 1/8).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.