#ENGvPAK : पाक संघ राहतोय सामान्य लॉजमध्ये

मालिकेचे प्रक्षेपणही संकटात

डर्बिशायर :-करोनाच्या धोक्‍यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळावर आर्थिक दिवाळखोरीचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. त्यामुळे नेहमी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सहभागी होत असताना एका सामान्य लॉजमध्ये राहावे लागत आहे. याबाबतचे वृत्त एका संकेतस्थळाने एका पाकिस्तानी क्रीडा पत्रकाराच्या हवाल्याने दिले आहे.

करोनामुळे गेले 3 महिने क्रिकेट ठप्प झालेले आहे. तसेच पेप्सी कंपनीशी असलेला मंडळाचा करारही संपुष्टात आला आहे. निविदा काढल्यानंतरही संघाला प्रायोजक मिळालेला नाही. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्या समाजसेवी संस्थेने अल्प सहकार्य केले असल्याने पाक संघाला त्याच्या संस्थेचा लोगो वापरून खेळावे लागणार आहे. इंग्लंडला दाखल झालेल्या पाकिस्तान संघाला मंडळाच्या आर्थिक दिवाळखोरीचा मोठा फटका बसला आहे.

या दौऱ्यात 3 कसोटी व 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. प्रत्येक परदेश दौऱ्यात सर्व संघ पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात यंदा मात्र, पाक संघाला येथील एका सामान्य लॉजमध्ये राहावे लागत आहे. इतकेच नव्हे तर या मालिकेचे थेट प्रक्षेपणही संकटात सापडले आहे. प्रक्षेपण करत असलेल्या वाहिनीचेही पैसे मंडळाने अद्याप दिलेले नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.