लीड्स – इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याची तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या 15 जणांच्या संघात निवड झाली होती. मात्र, त्याची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होती.
अखेर, तो खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने त्याला तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. वूडला भारताविरुद्ध लॉर्डसमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी उजव्या खांद्याला दुखापत झाली होती.
या दुखापतीमुळे वूड जरी तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला असला, तरी तो लीड्समध्ये संघासोबतच राहील. त्याच्या दुखापतीवर इंग्लंडचे वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे.
त्याच्याऐवजी तिसऱ्या कसोटीसाठी साकीब महमूद आणि क्रेग ओव्हरटन यांना इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळू शकते.