#ENGvIND 3rd Test : कोहलीला भोवतोय अँडरसन फॅक्‍टर

लीड्‌स – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या येथे सुरू आहे. याही सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने पुन्हा एकदा भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद केले. कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनशी बरोबरी केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीला सातत्याने हा अँडरसन फॅक्‍टर भोवताना दिसत आहे. कोहली विरुद्ध अँडरसन असेच या कसोटी मालिकेत चित्र दिसत आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यातही अँडरसनने कोहलीला 7 धावांवर बाद करत त्याच्याविरुद्ध पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्या नॅथन लॉयनची बरोबरी केली आहे.

अँडरसनने कोहलीला आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा बाद केले आहे. लॉयनने देखील कोहलीला 7 वेळा बाद केले आहे. स्टुअर्ट ब्रॉड, मोईन अली, पॅट कमिन्स आणि बेन स्टोक्‍स यांनी कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत प्रत्येकी
5 वेळा बाद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.