मॅंचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत शनिवारी मॅंचेस्टर युनायटेडच्या ब्रूनो फर्नांडिसच्या पेनल्टीच्या मदतीने ऍस्टन व्हिलाचा 2-1 असा पराभव केला.
या विजयासह मॅंचेस्टर युनायटेडने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या लिव्हरपूलच्या बरोबरीत 16 सामन्यांत 33 गुण मिळविले आहे; परंतु गोल फरकामुळे त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.