लंडन – इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य मानल्या जात असलेल्या चेल्सी संघाला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. साखळी फेरीतील सामन्यात वुल्व्हज संघाने चेल्सीचा 2-1 असा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे.
या सामन्यात चेल्सीच्या ऑलिव्हर गिरार्डने 49 व्या मिनिटाला गोल करत थाटात सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या खेळाडूंना दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नाही. उलट वुल्व्हजने त्यांचा बचाव भेदण्यात दोन वेळा यश मिळवले.
सामन्याचा पहिला हाफ सुरू झाल्यावर गोल स्वीकारलेल्या वुल्व्हज संघाच्या डॅनियल पोडेन्सने 66 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसरा हाफ सुरू झाल्यावरही दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मात्र, पेड्रो नेटो याने अतिरिक्त वेळेत 95 व्या मिनिटाला गोल केला व वुल्व्हजची आघाडी 2-0 अशी वाढवताना सामनाही जिंकून दिला.