“अंग्रेजी मिडीयम’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यातयेणार आहे, अशी अफवा काही दिवसांपूर्वीपासून पसरायला लागली होती. मात्र आता ही अफवा निर्मात्यांनी खोडून काढली आहे. “अंग्रेजी मिडीयम’मूळच्याच रिलीज डेटला प्रदर्शित होणार आहे. असे या सिनेमाचे प्रोड्युसर दिनेश विजन यांनी शनिवारी कन्फर्म केले. त्यामुळे येत्या 13 मार्च रोजी “अंग्रेजी मिडीयम’ रिलीज होणार हे निश्चित आहे.
देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. त्यामुळे सिनेमाघरांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी होते आहे. म्हणून “अंग्रेजी मिडीयम’चा रिलीज पुढे ढकलला जाणार असल्याची अफवा पसरायला लागली आहे. मात्र यासंदर्भात दिनेश विजन यांनी स्पष्टिकरण दिले आहे. ट्विटरवरच्या पोस्टमध्ये त्यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
“अंग्रेजी मिडीयम’ हा 2017 च्या “हिंदी मिडीयम’चा सिक्वेल आहे. इरफान खानच्या बरोबर यामध्ये प्रथमच करीना कपूर- खान असाअर आहे. पहिल्या भागामध्ये इरफान खानच्या बरोबर साबा कमर ही पाकिस्तानी अभिनेत्री होती. त्यामुळे इरफान आणि करीनाची ऑन स्क्रीन केमिस्ट्री या दुसऱ्या भागात प्रथमच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.