#PSL2020 : करोनामुळे दहा परदेशी खेळाडू मायदेशी परतले

इस्लामाबाद – चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंमुळे क्रीडा क्षेत्राला चांगलाच फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. या विषाणूंचा प्रसार तसूभरही कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने क्रीडाक्षेत्रातील अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यातच पाकिस्तान क्रिकेट लीगमधील दहा परदेशी खेळाडूदेखील करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपपल्या देशांमध्ये परतले.

पाकिस्तानमधून परतलेल्या खेळाडूमध्ये इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्स, टाॅम बँटन, लिआम डाॅसन, लुइस ग्रेगरी, लिआम लिव्हिंगस्टोन, टॅमल मिल्स, जेसन राॅय, जेम्स विन्स, वेस्टइंडिजचा कार्लोस ब्रेथवेट आणि दक्षिण आफ्रिकेचा रिली राॅसोऊ यांचा समावेश आहे.

दरम्यान, करोनाने जगभरात घेतलेल्या बळींनी शुक्रवारी 5 हजार हा आकडा ओलांडला. जगातील 133 देशांमध्ये करोना फैलावला आहे. त्या विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात 5 हजार 116 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये चीनमधील मृतांची संख्या सर्वांधिक 3 हजार 177 इतकी नोंदली गेली आहे. त्याखालोखाल इटलीत 1 हजार 16 जण तर इराणमध्ये 514 जण मृत्युमुखी पडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.