अहमदाबाद – टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी (India vs England 3rd Test Live) सामन्यास आज मोटेरो स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. फिरकीपटू अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीसमोर इंग्लंडचा पहिला डाव केवळ 112 धावसंख्येवर आटोपला.
– अक्षर पटेलचे 6 बळी
-आर आश्विनचे 3 तर इशांतचा 1 बळी
-जॅक क्राउलीची अर्धशतकी खेळी
– इंग्लंडचे डाॅम सिबली आणि जाॅनी बेयरस्टो शूऩ्यावर बाद
इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. मात्र, भारतीय फिरकीसमोर जॅक क्राउली वगळता एकही इंग्लंडचा फलंदाज तग धरू शकला नाही. क्राउलीने सर्वाधिक 53 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 6 बळी घेतले. तर आर आश्विनने 3 आणि इंशातने 1 बळी घेतला.
ENG : 112/10(48.4)
इंग्लंड फलंदाजी : जॅक क्राउली 53(84), डाॅम सिबली 0(7), जाॅनी बेयरस्टो 0(9), जो रूट 17(37), बेन स्टोक्स 6(24), आॅली पोप 1(12), बेन फोक्स 12(58), जोफ्रा आर्चर 11(18), जॅक लीच 3(14), स्टुअर्ट ब्राॅड 3(29), जेम्स अॅडरसन 0*(3)
भारतीय गोलंदाजी – अक्षर पटेल 38/6(21.4), इशांत शर्मा 26/1(5.0), रविचंद्रन अश्विन 26/3(16.0), जसप्रीत बुमराह 19/0(6.0).