#U19CWC : इंग्लंडचा जपानवर ९ विकेटनी विजय

पोशेस्ट्रूम (द. आफ्रिका) : डैन मूसलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील (Plate Quarter Final 2) सामन्यात जपानचा ९ गडी राखून पराभव केला आहे. इंग्लंडचा फलंदाज डैन मूसली सामन्याचा मानकरी ठरला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत जपानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. जपानने प्रथम फलंदाजी करताना ३८.४ षटकांत सर्वबाद ९३ धावा केल्या होत्या. जपानकडून फलंदाजीत देबाशीष साहूने २४, शू नोगुचीने २० आणि मार्कस थरगटेने ११ धावांची खेळी केली. जपानच्या पाच फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. इंग्लंडकडून गोलंदाजीत स्काॅट करी आणि हमीदुल्लाह कादरीने प्रत्येकी ३ तर जाॅय एविसनने २ आणि लेविस गोल्डसवर्थीने १ गडी बाद केला.

https://twitter.com/U19WORLDCUP2020/status/1221749527637413888?s=19

विजयासाठीचे ९४ धावांचे आव्हान इंग्लंडने १ विकेटच्या मोबदल्यात ११.३ षटकांत पूर्ण केले. इंग्लंडकडून सैम यंगने १६ तर जाॅर्डन काॅक्सने नाबाद १६ आणि डैन मूसलीने नाबाद ५७ धावांची खेळी केली. जपानकडून मैक्सीमिलियनने १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.