जोहान्सबर्ग : गोलंदाजांच्या अचूक व प्रभावी मा-याच्या जोरावर इंग्लंडने मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा १९१ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. मार्क वूड सामन्याचा मानकरी ठरला तर बेन स्टोक्स मालिकावीर ठरला.
RESULT| England win by 191 runs.
Nortje is the last man to depart. Rassie Van der Dussen's 98 gave South Africa a flicker of hope but England proved too strong.
England beat South Africa 3-1 in Test series.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/4JxYcDxg5d
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 27, 2020
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जक क्राॅल ६६, जो रूट ५९, आॅली पोप ५६, डोमिनिक सिबली ४४, स्टुअर्ट ब्राॅड ४३ आणि मार्क वूडच्या नाबाद ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ९८.२ षटकांत सर्वबाद ४०० धावा केल्या होत्या. द.आफ्रिकेकडून गोलंदाजीत ऐनरीक नाॅर्टजेने सर्वाधिक ५, ब्यूरन हेड्रिक्संने १, वरनाॅन फिलेंडर आणि डेन पॅटरसन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्यानंतर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद १८३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात क्विटंन डी काॅकने सर्वाधिक ७६ आणि ड्वेन प्रीटोरियसने ३७ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजीत मार्क वूडने सर्वाधिक ५ तर क्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्यानंतर इंग्लंडने दुस-या डावात जो रूटच्या ५८, डोमनिक सिमलीच्या ४४ आणि सॅम करनच्या ३५ धावांच्या जोरावर सर्वबाद २४८ धावा करत पहिल्या डावातील २१७ धावांच्या आघाडीसह दक्षिण आफ्रिकेसमोर ४६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेकडून ब्यूरन हेंड्रिक्सने सर्वाधिक ५ तर ऐनरिक नाॅर्टजे आणि प्रीटोरियसने प्रत्येकी २ गडी बाद केले.
England are all out for 248! South Africa need 466 to win.#SAvENG https://t.co/ggKmmyLxuq
— ICC (@ICC) January 26, 2020
विजयासाठी ४६६ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ७७.१ षटकांत २७४ धावांवर संपुष्टात आल्याने त्यांना १९१ धावांनी पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेकडून रॅसी वॅन डर डुसेन याने ९८, क्विंटन डी काॅकने ३९, फाफ डू प्लेसीने ३५ आणि टेम्बा बवुमाने २७ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून दुस-या डावात गोलंदाजीत मार्क वूडने सर्वाधिक ४ तर स्टुअर्ट ब्राॅड आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी २ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.