बनोनी : डैन मूसलीच्या शतकी आणि लेविस गोल्डसवर्थी यांच्या पाच विकेटच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेचा १५२ धावांनी पराभव करत आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील प्लेट ट्राफी पटकावली. डैन मूसली याला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.
Plate Final. It's all over! England Under 19s win by 152 runs https://t.co/8NIcpFj9nK #SLvENG #U19CWC
— ICC Live Scores (@ICCLive) February 3, 2020
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने डैन मूसलीच्या १११(१३५), जैक हेन्सच्या ६८(७८) आणि जाॅय एविसनच्या ५९(४५) धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद २७९ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून सुदीरा तिलकरत्ने आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
विजयासाठी २८० धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव ३१ षटकात १२७ धावसंख्येवर संपुष्टात आला. श्रीलंकेकडून रविंदु रसंताने सर्वाधिक ६६(८१) तर कामिल मिश्राने १५(१७) धावांची खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजीत लेविस गोल्डसवर्थी याने ७ षटकात २१ धावा देत सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर जाॅर्ज बाल्डर्सन आणि स्काॅट करीने प्रत्येकी १ विकेट घेतली.