किम्बर्ली : जाॅर्ज हिल आणि हमीदुल्लाह कादरीच्या अचूक गोलंदाजीनंतर सॅम यंगच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील ‘ब’ गटातील साखळी सामन्यात नायजेरियाचा ८ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. इंग्लंडचा गोलंदाज जाॅर्ज हिल सामन्याचा मानकरी ठरला.
England win!
They finish third in Group B.#U19CWC | #ENGvNGA | #FutureStars pic.twitter.com/imxYRoOacz
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 25, 2020
नायजेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, पण इंग्लंडच्या आकम्रक व अचूक गोलंदाजीसमोर नायजेरियाचा डाव २७.५ षटकांत ५८ धावांवर संपुष्टात आला. नायरेजियाकडून सिल्वेस्टर ओकपेने सर्वाधिक १६ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर एकाही फलंदाजांला दुहेरी धावंसख्येचा आकडा गाठता आला नाही. इंग्लंडकडून गोलंदाजीत जाॅर्ज हिलने ७.५ षटकांत १२ धावा देत ४ तर हमीदुल्लाह कादरीने ७ षटकात २४ धावा देत ४ गडी बाद केले. स्काॅट करी आणि जाॅर्ज बाल्डर्सन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
For his 4/12 with the ball England's George Hill is Player of the Match!#U19CWC | #ENGvNGA | #FutureStars pic.twitter.com/3GiJk44Ree
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 25, 2020
विजयासाठीचे ५९ धावांचे आव्हान इंग्लंडने ११ षटकांत २ बाद ६४ धावा करत पूर्ण केले. इंग्लंडकडून टाॅम क्लार्कने ११, जाॅर्डन काॅक्सने १, जाॅर्ड हिलने नाबाद ७ आणि सॅम यंगने नाबाद ३९ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नायजेरियाकडून रशीद अबोलारिन आणि पीटर आहोने प्रत्येकी १ गडी बाद केला.