#ENGvWI 2nd Test : इंग्लंडचा वेस्टइंडिजवर शानदार विजय

बेन स्टोक्स सामनावीर : मालिका 1-1 ने बरोबरीत

मँचेस्टर – वेस्टइंडिज विरूध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 113 धावांनी विजय साकारला आहे. विजयासाठी 321 धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचा दुसरा डाव 198 धावांवर आटोपला आणि इंग्लंडने विजय साकारत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. बेन स्टोक्स सामन्याचा शिल्पकार ठरला. त्याने फलंदाजीत 254 धावा तर गोलंदाजीत 3 बळी घेतले. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आता मँचेस्टर येथे 24 जुलै रोजी होणार आहे.

दरम्यान, पहिल्या डावात चारशेचा(9 बाद 469) पल्ला गाठलेल्या इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पहिला डाव 287 धावांवर संपुष्टात आणला. चौथ्या दिवशी यजमानांनी आपला दुसरा डाव 3 बाद 129 धावांवर घोषित केला व वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 312 धावा करण्याचे आव्हान ठेवले होते.

विजयासाठी 312 धावांचा पाठलाग सुरू केल्यावर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड व ख्रिस वोक्‍स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज कोसळले. सामन्याच्या अखेरच्या व पाचव्या दिवशी चहापानापर्यंत वेस्ट इंडिजची गत 5 बाद 137 अशी झाली होती. त्यानंतर अवघ्या 61 धावांत त्यांच्या पाच फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांनी तबूंत पाठवले.

दुसऱ्या डावात वेस्टइंडिजकडून शमर ब्रूक्सने 62, जेरेमी ब्लॅकवूडने 55 आणि कर्णधार जेसन होल्डरने 35 धावांची खेळी केली मात्र, संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्राॅडने 3 तर क्रिस वोक्स,डोमनिक बेस आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. सॅम करनने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :

इंग्लंड : पहिला डाव – 9 बाद 469 घोषित. वेस्ट इंडिज : पहिला डाव – 287. इंग्लंड : दुसरा डाव – 19 षटकांत 3 बाद 129 घोषित. (बेन स्टोक्‍स नाबाद 78, ओली पोप नाबाद 12, केमार रोश 2/37). वेस्ट इंडिज : दुसरा डाव – 70.1 षटकांत  सर्वबाद 198 (शमर ब्रूक्स62, जेरेमी ब्लॅकवूड 55, जेसन होल्डर 35 , स्टुअर्ट ब्रॉड 3/42,बेन स्टोक्स 2/30, क्रिस वोक्स 34/2 डोमनिक बेस 2/59,).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.