कार्डिफ – विश्वचषक स्पर्धेत आज यजमान इंग्लंड संघाचा तिसरा सामना बांगलादेशविरूध्द रंगणार आहे. मागील सामन्यात पाकिस्तान विरूध्द झालेल्या पराभवामुळे इंग्लंडचा संघ आजच्या सामन्यात विजयाच्या इराद्याने उतरणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडकडून दुसऱ्या सामन्यात हार स्विकारावी लागल्यानंतर बांगलादेशसुध्दा आजच्या सामन्यात विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.
इंग्लंड संघाची गोलंदाजीची मदार ही वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर असणार आहे. तर त्याला साथ देण्यासाठी क्रिस वोक्स आणि मार्क वुड असणार आहेत. फिरकीपटू आदिल राशिद आणि मोइन अली यांची कामगिरीसुध्दा महत्वपूर्ण ठरणार आहे. फलंदाजीची धुरा ही जेसन राॅय, जाॅनी बेयरस्टाॅ, जो रूट, इयाॅन माॅर्गन यांच्यावर असणार आहे.
बांगलादेशकडे तमीम इकबाल, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसन अशी मजबूत फलंदाजी आहे. जर इंग्लंडवर विजय मिळवयाचा असेल तर बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमान, मशरफे मुर्तजा, मेहदी हसन यांना इंग्लंडच्या फलंदाजाना झटपट बाद करावे लागेल.
England v Bangladesh
10:30 BST
📍 Cardiff
#️⃣ #ENGvBAN#WeAreEngland #RiseOfTheTigersWhich side will get their second win of #CWC19 today? pic.twitter.com/aPbv48ij7M
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 8, 2019
प्रतिस्पर्धी संघ –
बांगलादेश – मशरफे मुर्तजा (कर्णधार), तमीम इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, रुबेल हुसैन, मुस्तफिजुर रहमान, अबु जायेद, महामदुल्लाह, मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्दक हुसैन, शाकिब अल हसन, मेहेदी हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मुश्फीकुर रहीम (यष्टीरक्षक), मोहम्मद मिथुन.
इंग्लंड – इयोन मोर्गन (कर्णधार), मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो (यष्टीरक्षक), जोस बटलर, टॉम कुरैन, लियाम डॉसन, लियाम प्लंकट, आदिल राशिद, जोए रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विंसे, क्रिस वोक्स, मार्क वुड.