PAK vs ENG 2022 – इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात २७ २७ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. ही मालिका पाकिस्तानात खेळवली जाणार असून बेन स्टोक्सच्या ( Ben Stokes ) नेतृत्वातील इंग्लंडचा कसोटी क्रिकेट संघ रविवारी इस्लामाबादला पोहोचला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंड संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तर दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान पाहुण्यांना कडवे आव्हान देण्यास तयार आहे. दरम्यान, इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने एक मोठा निर्णय घेतला अन् त्याच्या या निर्णयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत.
“वेगवान बॉलरला संधी दिली जात नाही”,टीम इंडियाच्या गोलंदाजीबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
इंग्लंडचा संघ टी-२० विश्वचषकापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. त्यावेळी ७ सामन्यांच्या टी-२० मालिकेत इंग्लंडने ४-३ अशा फरकाने यजमानां धूळ चारली होती. महत्वाचं म्हणजे इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तब्बल १७ वर्षांनी पाकिस्तानात आला आहे. यापूर्वी २००५ मध्ये इंग्लंडने पाकिस्तानमध्ये शेवटची कसोटी मालिका खेळली होती. त्यावेळी इंग्लंडला ३ सामान्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशा फरकाने मत खावी लागली होती.
“वेगवान बॉलरला संधी दिली जात नाही”,टीम इंडियाच्या गोलंदाजीबाबत पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
बेन स्टोक्सकडून पाकिस्तानातील पुग्रस्तांना मदतीचा हात
पाकिस्तान दौऱ्यावर मिळालेली मॅच फी तेथील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देत असल्याची घोषणा बेन स्टोक्सने ( Ben Stokes ) ट्विटद्वारे केली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, “ऐतिहासिक कसोटी मालिकेसाठी मी प्रथमच पाकिस्तानमध्ये आलोय ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. १७ वर्षानंतर येथे कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी आल्याची वेगळीच भावना आहे. अशावेळी संघाचे नेतृत्व करणे हेदेखील अभिमानस्पद आहे.”
A fantastic gesture from the skipper 👏
Show your support to the Pakistan Flood appeal: https://t.co/MT7YKe1ZJ5
🇵🇰 #PAKvENG 🏴 https://t.co/hKzT8lMtcw
— England Cricket (@englandcricket) November 28, 2022
“सध्या पाकिस्तानमध्ये आलेला पूर आणि त्यामुळे झालेला विध्वंस पाहणे खूपच वेदनादायक आहे. या पुरामुळे तेथील लोकांवर मोठं संकट ओढवलं आहे. खेळाने मला माझ्या आयुष्यात खूप काही दिले आहे. त्यामुळे मला वाटते की मी क्रिकेटच्या पलीकडे काहीतरी परत देणे गरजेचे आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी मला मिळणारी मॅच फी मी पूरग्रस्तांना मदत म्हणून दान करणार आहे. मी केलेली मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहचेल अशी मला आशा आहे.”