जोहान्सबर्ग : जो डेनलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने तिस-या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरूध्दची तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
Result | ENG: 257-8
England win the match by 2 wickets.
It’s a series tying victory, the spoils will be shared.
🏏De Kock (69) and Miller (69*) led the charge with the bat, as the Proteas posted 256.
Hendricks finished with 3-59
Ngidi took 3-63#ProteaFire #SAvENG #PinkDay pic.twitter.com/VuSN3WSKmV— Proteas Men (@ProteasMenCSA) February 9, 2020
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले २५७ धावांचे आव्हान इंग्लंडने ४३.२ षटकांत ८ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडकडून फलंदाजीत जो डेनलीने ६६(७९), जो रूटने ४९(५२), जाॅनी बेयर्सटोने ४३(२३) आणि टी बैटनने ३२(३२) धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी आणि ब्यूरन हेंड्रिक्सने प्रत्येकी ३ गडी बाद केले. ब्यूरन सिम्पाला आणि तरबेज शम्सीने प्रत्येकी १ गडी बाद केला.
Innings break | SA: 256-7
That’s the 50 overs done!
Miller (69*) wraps it up a 6 and brings up the 50 partnership for the 8th wicket.
De kock also notched up a half-century with his 69.
England need 257 to win the match and level the series.#ProteaFire #SAvENG #PinkDay pic.twitter.com/1tXPULh4CW
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 9, 2020
तत्पूर्वी इंग्लंडने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारली होती, त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी काॅकच्या ६९(८१), जे जे स्मट्सच्या ३१(३८) आणि डेविड मिलरच्या नाबाद ६९(५३) धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद २५६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून आदिल रशिदने ३ तर साकिब महमूद आणि मोईन अलीने १ गडी बाद केला.