#INDvENG 4th T20 : भारतीय संघात दोन बदल….

अहमदाबाद – फलंदाजी व गोलंदाजीतही अपयश आल्यामुळे तिसरा टी-20 सामना गमावलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात विजय मिळवण्याची नितांत गरज आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत आजच्या सामन्यात विजय मिळवत बरोबरी केली तरच अखेरच्या पाचव्या सामन्यातील विजयासह मालिका जिंकण्याची आशा निर्माण होणार आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी आजचा सामना “करो या मरो’, अशा स्थितीत आहे.

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार इयान माॅर्गन याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचरण केले आहे. चौथ्या टी 20 सामन्यासाठी भारतीय संघामध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. यामध्ये युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चाहरला संधी देण्यात आली आहे. तर इशान किशनच्या जागी सूर्यकुमारला संधी मिळाली आहे. इशानला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे चौथ्या टी 20 सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघामध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि राहुल चाहर.

इंग्लंड संघ –  इयान मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन,  मार्क वुड आणि  आदिल राशिद.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.